अंगाई (सचिन कांबळे)
(Humming) माझ्या बाळाला झोप का ग ना येई आई गाते तुला अंगाई जो बाळा जोजो......(४) झोपी गेल्या थकून चिऊ काऊ चिमण्या राजा नकोस जागा राहू किती खेळविसी पायी रुणझुण वाळा नीज नीज रे माझ्या बाळा जो बाळा जो जो (2) किती भिरभिरते नजर तुझी छताला जागतो उगा का छकुला माझा सानुला नको लागू कधी दृष्ट कुणाची तुजला नीज नीज रे माझ्या बाळा जो बाळा जो जो (२) राजा राणीची गोष्ट परीची सांगू उद्या ऐक लाडक्या नकोस आता जागू मी जोजविते पाळणा रे गोपाळा नीज नीज रे माझ्या बाळा जो बाळा जो जो (२) ये ग हम्मा दुधू देयी बाळाला ये ग गायी वाजवी घुंगुरवाळा किती खट्याळ ग लोभस रे लडिवाळ नीज नीज रे माझ्या बाळा जो बाळा जो जो (४) बाळ माझा आहे ग गुणी त्याला बोलू नका हो कुणी बाळ माझा कृष्णा कान्हा यशोदेचा ग हा तान्हा कृष्ण बाळाला लागुदे रे डोळा नीज नीज रे माझ्या बाळा जो बाळा जो जो (४)